नागपूर : कॅन्सरशी लढा देत नागपूरच्या तेजस्विनी खेडकरने दहावीत 78 टक्के मिळवले
नागपुरात कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाचा सामना करणाऱ्या तेजस्विनी खेडकरनं दहावीत ७८ टक्के गुण मिळवत तेजस्वी यश मिळवलंय. खेडकर कुटुंबाची एकुलती एक असलेली तेजस्वीनी साडे चार वर्षांपासून कॅन्सरशी लढतेय. आजवर तिच्यावर २८ केमोथेरपीचे सेशन्स, रेडीएशन आणि २ ऑपरेशन झाली. तिचा कॅन्सर बरा झाला.. मात्र थोड्याच दिवसात पुन्हा कॅन्सरने डोकं वर काढलं.. पुन्हा ट्रिटमेंट सुरु झाली.. यात तेजस्विनीचं वजन घटून फक्त १८ किलो झालं.. पण तरीही तिनं अभ्यासात कसर सोडली केली नाही.. मेहनत घेत तिने ७८ टेक्के गुण मिळवलेत.