नागपूर : कॅन्सरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार शक्य होणार, एनसीआय-टाटा ट्रस्टमध्ये करार
Continues below advertisement
नागपुरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट म्हणजेच एनसीआय आता टाटा मेमोरियल रुग्णालय आणि टाटा ट्रस्टशी जोडला गेला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एनसीआय आणि टाटा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे लवकरच नागपुरात कॅन्सर या असाध्य मानल्या जाणाऱ्या रोगावार आंतरराष्ट्रीय दर्जाची उपचार पद्धत सुरु होणार आहे. विशेष म्हणजे नागपूरसह संपुर्ण विदर्भ आणि मध्य भारतातील कॅन्सर रुग्णांसाठी हे रुग्णालय वरदान ठरु शकणार आहे.
Continues below advertisement