नागपूर : खंडणी उकळणाऱ्यांविरोधात व्यापारी संघटना आक्रमक

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या उपराजधानीत खंडणीवसुलीला पेव फुटलाय.,,,आज नागपुरातील व्यापाऱ्यांनी हफ्तावसुली करणाऱ्यांविरोधात जोरदार आंदोलन केलं आणि गुंडाराजविरोधात वाचा फोडली... नागपुरात अनेक व्यापारी सुपारीचा व्यवसाय करतात मात्र काही टोळकी त्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून बक्कऴ पैसा वसुल करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय...  गुंडांचा व्यापाऱात वाढता हस्तक्षेप व्यापाऱ्यांची डोकेदुखी ठरू लागलाय... आणि याविरोधात आज व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून खंडणीवसुलीविरोधात आंदोलन केलं...त्याचबरोबर पोलिस आणि सरकारकडे संरक्षणाची मागणी केली,,, जर खंडणीखोरांवर वचक बसवला नाही तर नागपूर सोडून मध्यप्रदेशमध्ये व्यापार करू असा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram