जन्मताच आईसह स्वतःसाठी 5 वर्षांचा मोफत कॅब प्रवास मिळवणारा चिमुकला सध्या नागपुरात चर्चेत आहे. 3 जानेवारी रोजी संपूर्ण राज्य बंद असताना, कोणतेही वाहन धावत नसताना या चिमुकल्याने धावत्या ओला कॅबमध्ये जन्म घेतला. मदतीला धावून येणारा कॅब चालक शहजाद खान आमच्यासाठी देवदूत असल्याची मेश्राम कुटुंबाची भावना आहे. ओला कंपनीने नवजात बाळाला आईसह 5 वर्ष मोफत प्रवासाचे ऑफर दिली.