नागपूर: पावसाच्या पाण्याने विधीमंडळ परिसरात दारुच्या बाटल्यांचा खच
Continues below advertisement
नागपूरमधील मुसळधार पावसाचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात वीजपुरवठा खंडित केल्याने इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज ठप्प झालं आहे. परंतु विधीमंडळाबाहेर पाणी साचण्यामागचं प्रमुख कारण आता समोर आलं आहे.
विधानभवन परिसरात पाण्याचा निचरा होणाऱ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाटल्यांचा खच साचला होता. सुरुवातीला नाला काठोकाठ भरलेला होता. त्यामधूनच पाण्याचा निचरा होत होता. परंतु गटाराचं पुढचं झाकणं उघडलं असता पाणी साचण्याचं कारण समोर आलं. इथे दारुच्या बाटल्या तसंच प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच होता. कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणि पिशव्या बाजूला केल्यानंतर पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली.
Continues below advertisement