नागपूर : बसच्या खिडकीचा रॉड प्रवाशाच्या खांद्यात आरपार घुसला
Continues below advertisement
नागपुरात एसटी बस आणि शहर बसच्या अपघातात एक प्रवासी थोडक्यात बचावलाय. संजय पुराणिक हे प्रवासी खिडकीत बसले होते. या अपघातात खिडकीची लोखंडी सळई संजय यांच्या खांद्यात आरपार घुसली. नागपूर-वर्धा रोडवरील चिंचभुवन परिसरात बुधवारी ही घटना घडलीय. हा प्रकार एवढा भयानक होता की, रॉड प्रवाशाच्या खांद्यात आरपार घुसून बसच्या सीटमध्ये रुतला होता. यानंतर ती बस थेट जवळच्या रुग्णालयात नेण्यात आली. एका छोट्याश्या शस्त्रक्रियेनंतर हा रॉड संजय पुराणिक यांच्या शरीरातून बाहेर काढण्यात आला. आणि त्यांचे प्राण वाचले. पुराणिक हे छत्तीसगडचे रहिवासी असून ते नागपूरहून वर्ध्याला जात होते.
Continues below advertisement