नागपूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या उपराजधानीत दोन हत्या

Continues below advertisement
नागपूरात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाचं दोन गंभीर प्रकार घडले. सिव्हिल लाईनमध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात रात्री 9.30 वाजता प्रेमलाल देसाई नावाच्या इसमावर अज्ञान हल्लेखोरानं चाकू हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर प्रेमलाल न्यायालयाच्या आवारात धावला आणि तिथंच त्यानं आपला जीव सोडला. यावेळी न्यायालयाच्या परिसरात रक्ताचा सडा पडलेला पाहायला मिळाला. तर दुसरीकडे काल सकाळी आशीर्वाद नगरमध्ये रावनजी दुराई या इडली विक्रेत्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांनी नागपूरात गुन्हेगारांवर पोलिसांचा काहीच धाक नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram