नागपूर | यूट्यूबवर व्हिडीओ पाहून ATM लुटण्याचा प्रयत्न, टेलरला बेड्या
Continues below advertisement
यूट्यूबवर व्हिडीओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लक्ष्मण जयसिंगपूरे असं आरोपीचं नाव आहे. लक्ष्मण हा व्यवसायाने टेलर आहे. लक्ष्मणने काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर गॅस कटर आणि वेल्डिंग मशीनच्या मदतीने एटीएम फोडण्याचे तंत्र शिकवणारे व्हिडीओ त्याने पाहिले होते. आर्थिक चणचणीत असलेल्या लक्ष्मणने हेच तंत्र वापरुन एटीएम फोडून एकाच झटक्यात लाखो रुपये कमावण्याची योजना आखली.
Continues below advertisement