नागपूर : एकदा मृत्यूचा चकवा, मात्र काळाने 24 तासात पुन्हा गाठलं
Continues below advertisement
मृत्यूला त्याने एकदा चकवा दिला, मात्र काळाने त्याला 24 तासांच्या आत पुन्हा गाठलं. अपघातातून बचावलेल्या 12 वर्षांच्या चिमुरड्याला रुग्णवाहिकेने नेताना तिलाही पुन्हा अपघात झाला. यामध्ये चिमुरड्यासह त्याच्या आईनेही जीव गमावला. नागपूर-अमरावती महामार्गावर रुग्णवाहिका आणि ट्रकच्या अपघातात अकोल्यातील चौघांचा बळी गेला. ज्या मुलाला या रुग्णवाहिकेतून नेलं जात होतं, त्याचा काही वेळापूर्वी अपघात झाला होता. रुग्णवाहिकेतून नागपूरला नेलं जात असताना काळानं पुन्हा त्याला गाठलं.
Continues below advertisement