नागपूर : दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक
Continues below advertisement
आज दुसऱ्या दिवशीही राज्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दुधाच्या गाड्या रोखल्या. बीड जिल्ह्यातल्या पाली गावात दुधाचा टँकर फोडण्यात आला. ज्याप्रमाणे एखाद्या पाण्याच्या टँकरमधून पाणी सोडलं जातं, त्याप्रमाणे इथल्या टँकरमधून दूध सोडलं गेलं. तब्बल 20 हजार लीटर क्षमतेचा हा टँकर होता. टँकर फोडल्यानंतर गावातल्या लोकांनी एकच गर्दी केली. आणि हंडे-कळश्यांमधून दूध घरी नेलं. तिकडे जालन्याच्या पासोडी शिंदी गावात दुधाच्या गाड्या अडवून दूध रस्त्यांवर सांडण्यात आलं. जाफराबादवरुन बुलडाण्याच्या दिशेनं दुधाच्या गाड्या जात होत्या. तर सांगलीतल्या कडेगावमधल्या आसदमध्ये दूध उत्पादका शेतकऱ्यांना दुधाचा अभिषेक घालून निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर दूध उत्पादकांनी एकत्र येऊन रस्त्यावर दूध ओतून दिलं.
Continues below advertisement