नागपूर : सरकारच्या इशाऱ्यावरुन पोलीस विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडत आहेत- अजित पवार
आदिवासी विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, माध्यमांना धक्काबुक्की करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो म्हणत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलंय.
आपल्या हक्कासाठी तब्बल चार दिवसांपासून पायपीट करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना डांबण्याचा पराक्रम नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी केला आहे. या विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेत असलेल्या एबीपी माझाच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि कॅमेराची तोडफोड करण्यात आली होती. त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. सरकारच्या इशाऱ्यावरुन पोलीस विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडत आहेत. असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय.