नागपूर : वाढत्या उष्णतेमुळे देवासमोर कूलर बसवले, पुजाऱ्यांची शक्कल

Continues below advertisement

नागपूरमधल्या एका मंदिरामध्ये देवाला गरम होऊ नाही, म्हणून चक्क कूलर लावण्यात आले आहेत. देवाच्या मूर्तीसमोर हे कूलर बसवण्यात आले आहेत. सध्या नागपूरचा पारा 44 अंशांवर जाऊन पोहचला आहे. महाराष्ट्राच्या अनेक बहुतेक भागातला पारा 40 अंशांच्या पुढं आहे. सध्या राज्यात उष्णतेची लाट असल्यानं ही तापमान वाढ झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळंच की काय देवही या उष्णतेपासून वाचवण्यासाठी पुजाऱ्यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram