नागपूर : मोदी सरकारने केलेली हमीभावातील वाढ फसवी, विजय जावंधियांची टीका

Continues below advertisement
खरीप हंगामातील 14 पिकांना उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. तर धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. इतकच नाही तर यंदा दीडपट आणि 2022 मध्ये दुप्पट हमीभावाचं आश्वासनही मोदींनी दिलंय. सरकारच्या या निर्णयानं निसर्गाच्या लहरीपणामुळं हैराण झालेल्या, कर्जाच्या खाईत लोटलेल्या आणि नापिकीनं त्रस्त असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जवळपास 10 वर्षांनी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी यूपीए सरकारनं 2008-2009 मध्ये खरीप पिकांच्या हमीभावात 150 रुपयांनी वाढ केली होती. सरकारच्या या निर्णयानं आत्महत्येचा विचार करणाऱ्या बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा एकचा जगण्याची उमेद निर्णय होईल अशी आशा आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram