नागपूर : रुग्णालाच वॉर्डची सफाई करायला लावली, नागपूर मेडिकल हॉस्पिटलचा प्रताप
Continues below advertisement
माणसात आपण देव शोधतो तो म्हणजे डॉक्टर. मात्र नागपूरच्या मेडीकल हॉस्पिटलमध्ये थरथर कापत असणाऱ्या रूग्णालाच साफसफाई करायला लावल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. रोशन हिवरेकर असं या रूग्णाचं नाव आहे. रोशनच्या बाजूला असलेल्या रूग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या माणसाच्या लघवीची नळी वॉर्ड बॉयनं ओढून काढली. यात लघवी जमिनीवरच सांडली... इतर रूग्णांना याच त्रास होऊ लागल्यानं रोशननं वॉर्ड बॉयला ते साफ करायला सांगितलं. मात्र वॉर्ड बॉयनं साफसफाई करण्यास साफ नकार दिला. इतकंच नाही तर वर तोंड करून रोशनलाच सफाई करायला सांगितला. याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
Continues below advertisement