नागपूर : वडधामनामध्ये भीषण अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, पोलिसांकडून असंवेदनशीलतेचं दर्शन
Continues below advertisement
नागपूरजवळच्या वडधामनामध्ये भीषण अपघातात ७ विद्यार्थ्यांचा जीव गेलाय. या घटनेनंतर काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांचा प्रतिसाद हा धक्कादायक होता. पहिल्यांदा फोन केल्यावर पोलिसांनी पोलिस स्टेशन कोणतं असा प्रश्न विचारला. दुसऱ्यांदा फोन केल्यावर ज्या ठिकाणी अपघात झाला ती शहराची हद्द नाही तर ग्रामीणची आहे अशी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. कोणतेही पोलिस पाठवा असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यावर अंगात आल्यासारखं वागू नका असा संतापजनक उत्तर नियंत्रण कक्षातून देण्यात आलं. यामुळे पोलिसांमध्ये संवेदनशीलता शिल्लक राहीली नाहीये का असा प्रश्न पडतोय.
Continues below advertisement