नागपूर : नैराश्यग्रस्त तरुणीने अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवलं
Continues below advertisement
..मृत पावलेली थोरली बहीण स्वप्नात येऊन आपल्याला स्वतकडे बोलवत असल्याचं सांगून धाकट्या बहिणीनं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपुरात घड़लीये... .27 मार्चला रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास आकांक्षा गुप्तानं घरात कुणीही नसताना रॉकेल अंगावर टाकून स्वतला पेटवून घेतलं...80 टक्के भाजलेल्या आकांक्षाचा काल दुर्दैवी अंत झाला...ज्योती गुप्ता या थोरल्या बहिणीचा वर्षभरापूर्वी आजारपणामुळे दिल्लीत मृत्यू झाला होता...मात्र जीवापाड जीव असलेल्या बहिणीचा विरह आकांक्षा सहन करु शकली नाही...थोरल्या बहिणीच्या अवेळी मृत्यूनंतर आकांक्षा गुप्ता कमालीच्या नैराश्यात गेली .आणि मानसिक नैराश्यातून आकांक्षानं हे धक्कादायक पाऊल उचचलं...दरम्यान हा अंधश्रद्धेचा प्रकार तर नाही ना? या दृष्टीनं पोलिस या घटनेचा पुढचा तपास करतायेत..
Continues below advertisement