स्पेशल रिपोर्ट : नागपूर : एकाच घरातील पाच जणांची निर्घृण हत्या, संशयित मेहुणा बेपत्ता

नागपूर शहर आज पुन्हा एकदा हत्येने हादरलं. दिघोरी परिसरातील आराधना नगरमध्ये अख्ख्या कुटुंबाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मृतांमध्ये वृद्धेसह दोन मुलांचा समावेश आहे. तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन कुटुंबातील पाचही जणांची हत्या करण्यात आली.

कमलाकर पवनकर यांच्या घरी रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. यात कमलाकर (45 वर्ष) यांच्यासह अर्चना पवनकर (पत्नी, वय 40 वर्ष), मीराबाई पवनकर (आई, वय 70 वर्ष), वेदांती पवनकर (मुलगी, वय 12 वर्ष, ), कृष्णा उर्फ गणेश पालटकर ( भाचा, वय 4 वर्ष) यांचा मृत्यू झाला.

कमलाकर पवनकर हे भाजपमध्ये कार्यरत होते. त्यांचं प्रॉपर्टी डीलिंगचं छोटं-मोठं काम कमिशन बेसिसवर करत होते. याशिवाय त्यांचं इलेक्ट्रॉनिक साहित्याचं छोटं दुकानही होतं. तसंच घरासमोर एक दुकान त्यांनी भाड्यावर दिलं होतं.

हत्या नेमकी कोणी आणि कशासाठी केली हे अद्यापही कळू शकलेलं नाही. घरात चोरीचे किंवा झटपटीचे चिन्हं नाहीत. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीने हत्या केली आहे का, तसंच व्यावसायिक वैमनस्यातून हत्या झाली का, याचा तपास पोलिस करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola