नागपुरात शस्त्रांच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक, बंदुकांसह जिवंत काडतुसंही जप्त
Continues below advertisement
नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 4 रिव्हॉल्वर, एक देशी बनावटीची पिस्तूल, एक एयरगन आणि 5 जिवंत काडतूस असा शस्त्र साठा जप्त केला. याप्रकरणी इमान खान नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. आरोपीने मध्यप्रदेशातील छिंदवाडामधून ही शस्त्रे नागपुरात विकण्यासाठी आणली होती. इमरान खान हा नागपुरातील गुन्हेगारांच्या संपर्कात होता का याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
Continues below advertisement