नागपूर : एचसीएल कंपनीत 12 हजार नोकऱ्या, स्थानिकांना प्राधान्य, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Continues below advertisement
नोकऱ्या नाहीत म्हणून अनेक बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात भटकतात... विदर्भातल्या तरुणांना तर मुंबई- पुण्यासारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. मात्र आता HCL कंपनीच्या नागपूरातील कँपसमुळे इथल्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालीय... आज HCL या आयटी कंपनीच्या नागपूर कँपसचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडलं. एच सी एल या आयटी आणि नेटवर्कींग क्षेत्रातील कंपनीमुळे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. सध्या 2000 नागपूरकरांना पहिल्याच फेजमध्ये नोकऱ्या मिळाल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आलीय.
Continues below advertisement