नागपूर : दहा हजार लीटरच्या टँकमध्ये तीन जण पडले, दोघे गंभीर, एकाचा मृत्यू
Continues below advertisement
नागपूरमध्ये दहा हजार लीटरच्या ऑईल टँकमध्ये तीन जण पडल्याची घटना घडली आहे. यात तिघांना बाहेर काढलं असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत होतं. पण त्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. तर उर्वरित दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
Continues below advertisement