मुंबई : नोटाबंदीपूर्वीचं 101 कोटींचं जुनं चलन तोटा दाखवा, नाबार्डचा बँकांना सल्ला
Continues below advertisement
महाराष्ट्रातल्या 8 जिल्हा बँकांना नोटाबंदीच्या दरम्यान जमा करण्यात आलेल्या 101 कोटींच्या जुन्या चलनाला ताळेबंदामध्ये तोटा दाखवा, असा सल्ला थेट नाबार्डनं दिल्यानं अनेक जिल्हा बँकांचे धाबं दणाणले आहे.
8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी झाल्यानंतर बँकेत जमा होणाऱ्या सर्व नोटा जिल्हा बँकांनी रिझर्व्ह बँकांना पाठवल्या आहेत. पण त्यातल्या काही रकमा स्वीकारायच्या की नाही याबाबतचा निर्णय केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे जोवर निर्णय होत नाही, तोवर हा आकडा तोटा दाखवण्याचा सल्ला नाबार्डचा आहे.