मुंबई | परेलमधील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू
परळच्या उच्चभ्रू परिसरातील क्रिस्टल टॉवरला लागलेली आग आता आटोक्यात आलीय... 17 मजली या इमारतीला सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलानं तातडीनं धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं. तरीदेखील ,इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही नागरिक अडकल्याची माहिती मिळतेय.. परंतु हे सर्व जण सुरक्षित स्थळी असून त्यांच्या बचावकार्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करतंय... अग्निशमन दलानं उंच शिडीचा वापर करुन वरच्या मजल्यावरील वृद्ध, महिला आणि लहान मुलांना बाहेर काढलं.