मुंबई : मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, धरणातील पाणीसाठ्यात घट
Continues below advertisement
पुढील दोन महिन्यांत मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत घटला आहे. भातसा, मोडक सागर, तानसा धरणांमध्ये असलेल्या पाणीपातळी घटत चालली आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबची आकडेवारी जाहीर केली आहे.
Continues below advertisement