मुंबई : झायरा वसीमशी विमानात असभ्य वर्तन करणारा अटकेत!
अभिनेत्री झायरा वसीमशी दिल्ली-मुंबई विमानात छेड काढणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. विकास सचदेव असं या व्यक्तीचं नाव असून तो मीडिया एंटरटेनमेंट कंपनीत काम करतो. मुंबईतील सहार पोलिसांनी ही कारवाई केली.
'दंगल गर्ल' झायरा वसिम सोबत विमानात झालेल्या असभ्य वर्तन प्रकरणी मुंबईतील सहार पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कलम 354 अन्वये आणि झायरा अल्पवयीन असल्यामुळे 'पोस्को' अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला . झायरासोबत झालेल्या असभ्य वर्तनाची थेट राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे.