मुंबई : 48 हजाराच्या कॅमेऱ्याऐवजी बॉक्समध्ये पाईपचे तुकडे, फ्लिपकार्टकडून फसवणूक

Continues below advertisement
फ्लिपकार्टच्या अजब कारभाराचा फटका मुंबईतल्या एका तरुणाला बसला आहे. तब्बल 48 हजार रुपयांच्या कॅमेरा बूक केल्यावर त्याच्या हाती चक्क पाईपचे तुकडे आणि इलेक्ट्रिक उपकरण पडलं.

सचिन ढोले नावाच्या तरुणानं फ्लिपकार्टवरुन Nikon D5300 Camera लेन्ससह मागवला होता. या कॅमेराची किंमत 48 हजार 490 रुपये असून सचिनने क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट केलं होतं.

दहा फेब्रुवारीला सचिनच्या ऑफिसच्या पत्त्यावर फ्लिपकार्टने डिलीव्हरी दिली. पार्सल ऑफिसमध्ये सिक्युरिटीने कलेक्ट केलं. संध्याकाळी त्याने पार्सल उघडलं तेव्हा कॅमेराच्या बॅग व्यतिरिक्त लोखंडी पाईपचे तुकडे मिळाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram