मुंबईचा पाऊस : घराबाहेर पडत मुंबईकरांनी लुटला पावसात भिजण्याचा आनंद
Continues below advertisement
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यरात्रीपासून मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झालीय. त्यामुळे मुंबईतल्या सखल भागात पाणी साचलं आहे. नेहमी प्रमाणे हिंदमाता, किंग्ज सर्कल आणि सायन लोकल स्टेशनवर पाणी साचल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हवामान विभागानं 12 तारखेपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे सर्व यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. पण सगळीकडे पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे. तर तिकडे भायखळा पोलिस ठाण्यात पाणी शिरल्यानं पोलिसांना कर्तव्य बजावताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.