मुंबई : ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Continues below advertisement
‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते आहे.

राजीव आडारकर असे या बेस्ट कर्मचाऱ्याचे नाव आहे. आडारकर वरळी बस आगारात बस निरिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

वरळी बस आगारात असतानाच आडारकर यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram