मुंबई: 8 मोठ्या पोलीस स्टेशनचा कार्यभार महिलांकडे

Continues below advertisement
मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी महिला पोलिसांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मुंबईतल्या आठ मोठ्या पोलीस स्टेशनचा कार्यभार महिलांकडे सोपवण्यात आला आहे. यामध्ये कप परेड पोलीस स्टेशन, एअरपोर्ट, सायन, सहार, गोरेगावातलं वनराई पोलीस स्टेशन, पंतनगर, आरे आणि बीकेसी या महत्वाच्या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. त्यामुळे 8 पोलीस स्टेशनची संपूर्ण जबाबदारी असलेलं मुंबई हे देशातील पहिलं शहर म्हणून समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी या कर्तृत्ववान महिलांचा सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. मुंबईकरांकडून मुंबई पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचं जोरदार स्वागत केलंय. तसेच
या महिला पोलीस निरीक्षकांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात स्तुती केली जातेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram