मुंबई : छगन भुजबळ यांना जामीन मंजूर, मात्र अजून आठवडाभर रुग्णालयातच मुक्काम
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र स्वादुपिंडाचा त्रास असल्यामुळे भुजबळांवर केईम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यास किमान एक आठवडा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.