मुंबई : श्रीदेवींच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? बोनी कपूर यांचं पहिल्यांदा स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App24 वर्षांपूर्वी बोनी कपूर यांनी श्रीदेवीला एक सरप्राईज दिलं होतं, ज्याने दोघांचंही आयुष्य नेहमीसाठी बदलून गेलं आणि तेवढ्याच वर्षांनी आता पुन्हा एकदा एका सरप्राईजने बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचं आयुष्य बदललं. फरक एवढाच होता, की हे सरप्राईज अशा वादळाच्या रुपाने आलं ज्यामुळे श्रीदेवी बोनी कपूर यांच्यापासून कायमची दूर गेली. ट्रे़ड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी आपल्या ब्लॉगमध्ये बोनी कपूर यांच्याशी श्रीदेवीच्या मृत्यूनंतर झालेल्या चर्चेतील सारांश शेअर केला आहे.