VIDEO I महाआघाडीत मनसे नको, काँग्रेसची भूमिका | मुंबई | एबीपी माझा
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला महाआघाडीत घेण्याविषयी सकारात्मक असताना काँग्रेस मात्र मनसेची साथ घेण्यास अनुकूल नाहीए. त्यामुळे मनसे महाआघाडीत नको, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीला कळवल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलंय. मनसेसोबत वैचारिक मतभेद असल्यानं त्यांना महाआघाडीत स्थान नको, असं चव्हाणांनी स्पष्ट केलंय. शिवाय, आंबेडकरांना देऊ केलेल्या 4 जागांवर त्यांच्या उत्तराची वाट पाहात असल्याचंही चव्हाणांनी म्हटलंय.