मुंबई : पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद

Continues below advertisement
माहिमच्या भूमीगत बोगद्याजवळ महापालिकेनं पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे उद्या मुंबईच्या काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे.
त्यामुळे कुलाबा ते सायन, माहिम, आणि पश्चिम उपनगरातील काही भागांमध्ये उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
भूमीगत बोगद्याच्या या कामासाठी मरोळ मरोशी पासून माहिम- रुपारेल आणि रेसकोर्स पर्यंतचा जलबोगदा 12 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे मुंबईकरांना उद्याच्या पाण्याचं नियोजन आजच करावं लागणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram