मुंबई | 9 महिन्यानंतर मोनोरेल पुन्हा ट्रॅकवर
मोठ्या खंडानंतर देशातली पहिली मोनोरेल अशी ओळख असणारी मुंबईतली मोनोरेल आज पुन्हा वडाळा ते चेंबूर अशी धावली.. सकाळी 6 वाजता मोनोरेल सुरु झालीय. रोज दर पंधरा मिनिटांनी मोनोची फेरी करण्यात येणार आहे.. रात्री दहा वाजेपर्यंत मोनोरेलच्या 130 फेऱ्या करण्यात येणार असल्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सांगण्यात आलंय. मोनो रेल्वेचा हा टप्पा सुरू करताना प्रवासी भाडय़ामध्ये वाढ करण्याचा ‘एमएमआरडीए’ प्रशासनाचा विचार होता. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, असे एक सदस्यीय समितीने आपल्या अहवालात नमूद केलंय. त्यानुसार प्रवासी भाडय़ात वाढ न करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने घेतला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्हैसूर कॉलनी स्थानकात डब्यांना आग लागल्यानंतर मोनोरेलची सेवा बंद होती...