मुंबई : शिवसेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या वर्णीची शक्यता
Continues below advertisement
शिवसेनेत नेतेपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याची माहिती आहे. येत्या नवीन वर्षात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. येत्या 23 जानेवारीला पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे. यात उद्धव ठाकरे यांची फेरनिवड केली जाणार आहे. यापूर्वी 23 जानेवारी 2013 साली उद्धव ठाकरेंची निवड झाली होती. आता पुन्हा 5 वर्षानंतर निवडणूक होत असल्यानं नेतेपदासाठी लॉबिंग सुरु असल्याचं कळतंय
Continues below advertisement