मेट्रो-3 प्रकल्पाचा मार्ग मोकळा, अग्यारींना धोका असल्याची याचिका निकाली | मुंबई | एबीपी माझा
मेट्रो-3च्या कामातील आणखीन एक अडथळा दूर झाला आहे. मेट्रो-3 च्या खोदकामामुळे दक्षिण मुंबईतील पारसी अग्यारींना धोका नसल्याचा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भातील याचिका निकाली काढली आहे. व्हीजेटिआयनं यासंदर्भात आपला अहवाल हायकोर्टात सादर केला होता. त्यामुळे अग्यारी परीसरात खोदकाम करताना व्हीजेटिआयच्या तज्ञ मंडळींना तिथं उपस्थित राहण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं आज (शुक्रवारी) हा निकाल जाहीर केला. हायकोर्टाच्या या निकालामुळे मुंबई मेट्रोरेल प्राधिकरण आणि राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.