विराटकडून वरळीतील 34 कोटींच्या घराचा व्यवहार रद्द
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Mar 2018 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मुंबईतील वरळीमधल्या भल्यामोठ्या आलिशान घराचा व्यवहार रद्द केला आहे. विराट हे घर आपल्या मनाप्रमाणे तयार करत होता. पण आता हे घर खरेदी करण्याचा विचार त्याने बदलल्याचं वृत्त आहे.
विराट कोहलीने 2016 मध्ये ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्सच्या ओमकार 1973 प्रोजेक्टमधील 34 कोटी रुपयांचं आलिशान घर खरेदी केलं होतं. टॉवर Cच्या 35 व्या मजल्यावरील या 7000 चौरस फुटांच्या फ्लॅटमध्ये सुपर लक्झरियस सुविधा असाव्यात, असं विराटची इच्छा होती. या घरासाठी चार गाड्यांचं पार्किंगही होतं. परंतु आता हे घर खरेदी करण्यात त्याला इंटरेस्ट नसल्याचं समोर आलं आहे.
या घराचं बांधकाम अद्याप सुरु आहे. या फ्लॅटचा व्यवहार तीन दिवसांपूर्वी अर्थात 20 मार्च रोजी रद्द करण्यात आला आहे.