VIDEO | आता भाजपच्या सभेतही 'ए लाव रे तो व्हिडीओ', राज ठाकरेंना त्यांच्याच स्टाईलने देणार उत्तर | एबीपी माझा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांमधून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र आता राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचं भाजपनं ठरवलं आहे. राज ठाकरे मांडत असलेल्या मुद्द्यांची वस्तुस्थिती मांडण्यासाठी भाजपही आपल्या सभेत व्हिडीओ दाखवणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.