मुंबई : मी अजित पवारांना सीरिअसली घेत नाही, विनोद तावडेंचा पलटवार
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाईप्रकरणी आज राष्ट्रवादी नेते अजित पवारांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर सडकून टीका केली. बोगस डीग्री असलेला व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री कसा असू शकता असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित बाबुरावजी घोलप पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल हे फक्त कुलगुरूंचं अपयश नसून शिक्षण मंत्रीही त्याला पूर्ण जबाबदार असल्याचं अजित पवार म्हणाले, तर आपण अजित पवारांना फारसं गांभीर्यानं घेत नाही. असं प्रत्युत्तर तावडेंनी दिलं.
Continues below advertisement