Flood Help | बोरीवलीमध्ये भाजपच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतफेरीचं आयोजन | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
सांगली आणि कोल्हापूरमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता अनेक हात पुढे येत आहेत. मुंबईतल्या बोरीवलीमध्ये आज भाजपच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी मदतफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी गल्लोगल्ली जाऊन लोकांकडून मदत स्वीकारली. बोरीवलीच्या नागरिकांनी रोख रक्कम, बिस्किटं आणि पाण्याच्या बॉटल्स अशा स्वरुपात भरघोस मदत केली. हा सारा निधी आणि साहित्य मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram