VIDEO | राज ठाकरेंच्या भाषणाचा विनोद तावडेंकडून समाचार | मुंबई | एबीपी माझा
राहुल गांधी पंतप्रधान हवे का ते आधी शरद पवारांना विचारा, नाहीतर पुढच्या स्क्रिप्ट मिळणार नाही अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी राज ठाकरेंवर केली आहे. शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. राज ठाकरेंनी केलेल्या या हल्लाबोलचा तावडेंनी समाचार केला.