मुंबई : पार्ले महोत्सवाला सुरुवात, दानवेंच्या हस्ते उद्घाटन
सलग 18 वर्षांपासून सुरु असलेल्या विलेपार्ले महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. महोत्सवाचं उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या. या महोत्सवादरम्यान दररोज विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.