मुंबई : महाराष्ट्र बंदचे हिंसक पडसाद, अनेक गाड्यांची तोडफोड, स्थानिकांची नाराजी
Continues below advertisement
भीमा कोरेगावच्या घटनेचे हिंसक पडसाद काल मुंबईत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी आंदोलकांनी प्रवासी वाहनांना टार्गेट केले आणि यात सर्वात जास्त नुकसान रिक्षाचालक आणि खासगी प्रवासी वाहन चालकांच्या गाड्यांचं झालं. वडाळ्यात 35 पेक्षा अधिक गाड्या फोडण्यात आल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. तर आंदोलनाच्या नावानं गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड करणाऱ्यांची धरपक़ड मुंबई पोलिसांनी सुरु केली आहे. रात्रीपर्यंत पोलिसांनी दीडशेहून अधिक जणांना ताब्यात घेतलंय. तर मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये 12 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
Continues below advertisement