मुंबई : पोलिस भरतीच्या चाचणीवेळी विक्रोळीत चार तरुणींना कारने उडवलं
Continues below advertisement
पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान चार तरुणींना कारने उडवले. मुंबईतील विक्रोळीत ही घटना घडली. सध्या महाराष्ट्र पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु असून, त्याअंतर्गत मुंबईत धावण्याची चाचणी पूर्व द्रुतगती मार्गावर सर्व्हिस रोडवर घेतली जात आहे. याच ठिकाणी आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान पोलीस भरती प्रक्रिया झाल्यावर विक्रोळी स्थानकाकडे जाताना 4 तरुणींना टाटा झेन गाडीने उडवले.
Continues below advertisement