मुंबई : नाणार प्रकल्पावरुन विरोधकांची भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका

Continues below advertisement
भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार कुठल्याही मंत्र्याला नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज नाणारमध्ये झालेल्या सभेत जमीन अधिग्रहणाची मूळ अधिसूचना रद्द करत असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन आता शिवसेना आणि भाजप आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यापार्श्वभूमीवर नाणारमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया राज्यसरकारकड़ून सुरु आहे. मात्र, आज उद्योगमंत्र्यांची घोषणा आणी  त्यापाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा यामुळे सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात राजकारण रंगल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram