Tiware Dam | स्वत:च्या पक्षांच्या आमदारांना वाचवण्यासाठी मंत्र्यांचं अजब तर्कट, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका | ABP Majha
तिवरे धरण दुर्घटनेचं पाप कुणाचं असा सवाल आता विचारला जात असताना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी अजब तर्कट लावलंय. खेकड्यांनी भगदाड पाडल्यानं धरणाचा भराव वाहून गेल्याचं ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, असं विधान सावंत यांनी केलंय. दुर्घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही यावर कुणावर गुन्हा दाखल करणार असा सवालच सावंत यांनी केलाय.