नवी मुंबई : महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेत पैलवान विजय चौधरीला सुवर्णपदक
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने नवी मुंबईत आयोजित तिसाव्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत सोनेरी पुनरागमन साजरं केलं आहे. विजयनं खुल्या वजनी गटात सलग तीन लढती जिंकून या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. पोलीस खात्यात भर्ती झाल्यावर त्यानं पहिल्याच स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. गेली सलग तीन वर्षे विजय चौधरीनं महाराष्ट्र केसरी किताबाचा मान मिळवला होता.