मुंबई : प्रशांत परिचारकांचं निलंबन मागे, शिवसेनेसह राष्ट्रवादी विधानसभेत आक्रमक
Continues below advertisement
जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन वर्षभराच्या आत मागे घेण्यात आलं. त्याविरोधात आता शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. परिचारक यांचं रद्द केलेलं निलंबन तातडीनं मागे घ्या, आणि परिचारक यांना निलंबित करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही बोलण्यासाठी उभे राहिले. आणि विधानसभेत गदारोळ झाला. त्यामुळे विधानसभेचं कामकाजही 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.
Continues below advertisement