मुंबई : विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
विधानसभा अध्यक्षांविरोधात आज विधानसभेत मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी विश्वास प्रस्तावानं प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासाठी विश्वास प्रस्ताव मांडला. जो आवाजी मतदानानं मंजूरही झाला.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे सभागृहात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यासाठी आज विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. मात्र सरकारकडून हरिभाऊ बागडेंच्यावतीनं विश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सरकारमध्ये राहुन सरकारला प्रत्येकवेळी अडचणीत आणणाऱ्या शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं..