मुंबई : औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव सक्तीच्या रजेवर, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Continues below advertisement
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात तशी घोषणा केली. सकाळपासून कचऱ्याच्या प्रश्नावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.
मिटमिटा आणि पडेगावमध्ये कचऱ्याच्या गाड्या पेटवल्यानं पोलिसांनी लोकांच्या घरावर दगडफेक केली होती.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. एकतर 28 दिवसांपासून शहरात कचऱ्याचे ढीग लागलेत. दुसरीकडे सरकारला त्यावर गावकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढता येत नाहीए. तिसरीकडे कोर्टानंही सरकारला फटकारलंय. अशा स्थितीत पोलिसांनी सामान्यांना वेठीला धरल्यानं संताप होता. त्यावर अखेर कारवाईचा उतारा शोधण्यात आलाय.