मुंबई : औरंगाबादच्या कचराप्रश्नावरुन विधानसभेत अजित पवार आणि विखे पाटील आक्रमक

औरंगाबादच्या कचरा प्रश्नाची आणि दगडफेकीची चौकशी पूर्ण होत नाही, तोवर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना पदावरुन दूर करा, अशी मागणी अजित पवारांनी केलीय.
औरंगाबादमध्ये पालिका आयुक्त म्हणून दीपक मुगळीकर तर पोलीस आयुक्त म्हणून यशस्वी यादव काम करत आहेत.
आज विधीमंडळाचं कामकाज सुरु होताच औरंगाबादच्या कचरा प्रश्नावरुन जोरदार खडाजंगी झाली. यावेळी शिवसेनेचे संजय शिरसाट, अजित पवार, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सरकारला धारेवर धरलं.
दरम्यान यावेळी सरकारतर्फे उत्तर देताना रणजीत पाटील यांनी पोलीस आयुक्तांच्या चौकशीचं आश्वासन दिलं. मात्र तरीही बराच वेळ विरोधक या प्रश्नावर आक्रमक झाले होते. तसंच सभागृहाच्या वेलमध्ये येऊन त्यांनी पोलीस आयुक्तांना रजेवर पाठवण्याची मागणी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola